🐐 महाराष्ट्रातील शेतकरी व तरुणांसाठी सुवर्णसंधी! ग्रामीण व अर्धग्रामीण भागात रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना" अंतर्गत ५०+५ शेळी-मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना (50+5 Sheli Mendhi Palan Yojana Maharashtra) राज्यात राबविण्यास प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभागाच्या ९ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार (क्र. डीएएचडी-१४०१७/१/२०२६-एएच-४) ही राज्यस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. ग्रामीण युवक, महिला, अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक आणि भूमिहीनांसाठी कमी जोखमीचा आणि स्थिर उत्पन्न देणारा हा एक प्रभावी व्यवसाय आहे.
📌ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेची थोडक्यात माहिती )
| घटक | तपशील |
|---|---|
| योजनेचे नाव | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना (५०+५ शेळी-मेंढी पालन प्रकल्प) |
| विभाग | कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, महाराष्ट्र शासन |
| एकूण प्रकल्प किंमत | ₹११,३८,५५४/- |
| शासकीय अनुदान | सर्वसाधारण: ५०% (₹५,६९,२७७/-) | अ.जा./अ.ज.: ७५% (₹८,५३,९१५/-) |
| अर्ज पद्धत | ऑनलाईन (महाडीबीटी २.० पोर्टल - MahaDBT 2.0) |
| कार्यक्षेत्र | मुंबई व मुंबई उपनगर वगळून महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्हे (क्लस्टर स्वरूपात) |
💰 ग्रामीण पशुधन उद्योजकता प्रकल्प किंमत आणि शासकीय अनुदान
या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प किंमत ₹११,३८,५५४/- इतकी निश्चित करण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% अनुदान आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी ७५% अनुदान दिले जाईल.
| प्रकल्पाचा तपशील | सर्वसाधारण प्रवर्ग (५०% अनुदान) | अनुसूचित जाती / जमाती (७५% अनुदान) |
|---|---|---|
| ५०+५ शेळी/मेंढी गट (प्रति शेळी/मेंढी ₹१२,००० व बोकड/मेंढा ₹१५,००० प्रमाणे) |
₹६,७५,०००/- | ₹६,७५,०००/- |
| तीन वर्षांचा विमा (१२.७५% + १८% GST) | ₹१,०१,५५४/- | ₹१,०१,५५४/- |
| शेड निर्मिती | ₹२,००,०००/- | ₹२,००,०००/- |
| कडबाकुटी यंत्र | ₹३०,०००/- | ₹३०,०००/- |
| सोलार (३ kw) | ₹१,३२,०००/- | ₹१,३२,०००/- |
| एकूण प्रकल्प किंमत | ₹११,३८,५५४/- | ₹११,३८,५५४/- |
| लाभार्थी हिस्सा | ₹५,६९,२७७/- | ₹२,८४,६३९/- |
| शासन अनुदान (DBT) | ₹५,६९,२७७/- | ₹८,५३,९१५/- |
🏦 अनुदान वितरण पद्धत (DBT - २ टप्प्यात)
शासन अनुदान लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे २ टप्प्यांत जमा केले जाईल:
- पहिला टप्पा (५०% अनुदान): योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांनी शेळी-मेंढीसाठी शेड निर्मिती, कडबाकुटी यंत्र आणि ३ kw सोलार खरेदी केल्यानंतर एकूण अनुदानाच्या ५०% रक्कम दिली जाईल.
- दुसरा टप्पा (५०% अनुदान): उर्वरित ५०% अनुदान शेळी/मेंढी गट खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जाईल.
🎯 ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना लाभार्थी निवडीचे निकष व आरक्षण
या योजनेत "प्रथम अर्ज सादर करणाऱ्याचा प्रथम विचार" या पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
पात्र घटक:
- अत्यल्प भूधारक: १ हेक्टरपर्यंतचे भूधारक.
- अल्प भूधारक: १ ते २ हेक्टरपर्यंतचे भूधारक.
- वनहक्क धारक: वनहक्क जमीनधारक लाभार्थी.
- महिला बचत गट: वरील क्र. १ ते ३ मधील महिला बचत गटातील लाभार्थी.
- आरक्षण: वरील घटकांमध्ये महिलांसाठी ३०% आणि दिव्यांगांसाठी ५% आरक्षण लागू राहील. पुरेशा पात्र महिला अर्जदार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील पुरुष लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल.
- कार्यक्षेत्र: ही योजना मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये क्लस्टर स्वरूपात राबविली जाईल.
- कुटुंब मर्यादा: एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळेल. तसेच मागील ३ वर्षांत केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर विभागाकडून समान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
📄 ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- जमिनीचा पुरावा: स्वतःच्या नावे किमान १ एकर जमिनीचा ७/१२ व ८-अ उतारा. वनहक्क धारकांसाठी ७/१२ वर इतर अधिकारात नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे "जे" प्रमाणपत्र. स्वतःची जमीन नसल्यास ५ वर्षे कालावधीसाठी नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा.
- प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र: पशुपालन व्यवसायाचे शासकीय/निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (अर्ज करताना नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र) किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र.
- जातीचे प्रमाणपत्र: अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी आवश्यक.
- दिव्यांग प्रमाणपत्र: दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र.
- बचत गट प्रमाणपत्र: महिला बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र.
- स्वयंघोषणापत्र: मागील ३ वर्षांत समान योजनेचा लाभ न घेतल्याचे ऑनलाइन स्वयंघोषणापत्र.
- MAHA-ID CARD : महाराष्ट्र सरकारच्या साव योजनांसाठी आवश्यक आहे.
💻 ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अर्ज प्रक्रिया
- ऑनलाइन अर्ज: योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- कागदपत्र तपासणी: प्राथमिक निवड झालेल्या अर्जांची तपासणी तालुका पशुसंवर्धन अधिकारी करतील. कागदपत्रांत काही त्रुटी असल्यास ५ दिवसांच्या आत पूर्तता करणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज बाद समजला जाईल.
- पहिल्या टप्प्याची मुदत (१ महिना): निवड झाल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर लाभार्थ्याने तालुका पशुसंवर्धन कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून १ महिन्याच्या आत शेड निर्मिती (पक्का कोबा - मुरूम/विटा/RCC, चारा गव्हाण, पाणी, वीज, पुरेशी उंची, वायूविजन, मलमूत्र निस्सारण सुविधांसह) व कडबाकुटी, ३ kw सोलार खरेदी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याचे जिओ-टॅग फोटो, खरेदी पावत्या व बँक तपशील पोर्टलवर अपलोड करावे लागतील. मुदतीत काम पूर्ण न केल्यास नाव प्रतीक्षा यादीत सर्वात शेवटी ठेवले जाईल.
- पहिला हप्ता वितरण कालावधी: अहवाल अपलोड केल्यानंतर तालुका अधिकारी १५ दिवसांत स्थळ पाहणी करतील, जिल्हा उपआयुक्त १० दिवसांत तपासणी करतील आणि आयुक्त पशुसंवर्धन १० दिवसांत DBT द्वारे पहिला हप्ता जमा करतील.
🏛️ जिल्हास्तरीय लाभार्थी निवड समिती
| अ.क्र. | अधिकारी / पदनाम | समितीतील भूमिका |
|---|---|---|
| १ | मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद | अध्यक्ष |
| २ | जिल्हा समाज कल्याण अधिकारी | सदस्य |
| ३ | प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प | सदस्य |
| ४ | जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी | सदस्य |
| ५ | जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त | सदस्य सचिव |
🐐 शेळ्या-मेंढ्यांची खरेदी, विमा आणि नोंदणी
- खरेदीची मुदत: पहिला हप्ता मिळाल्यानंतर कमाल १ महिन्याच्या आत गठीत खरेदी समितीसमवेत लाभार्थ्याने आपल्या पसंतीनुसार शेळ्या-मेंढ्यांची खरेदी करावी.
- खरेदी कुठून करायची?: पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून खरेदी करावी. तिथे उपलब्ध नसल्यास ना-उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खाजगी / राष्ट्रीय पशुधन अभियान / स्मार्ट प्रकल्पातील ब्रीडिंग फार्म्सवरून किंवा खुल्या बाजारातून वजनानुसार खरेदी करता येईल.
- वयोमर्यादा: खरेदी करावयाच्या शेळ्या-मेंढ्या, बोकड व मेंढे १ ते ३ वर्षे वयोगटातील आणि स्थानिक वातावरणात तग धरणाऱ्या असाव्यात.
- विमा व नोंदणी: शेळ्या-मेंढ्यांचा लाभार्थी व जिल्हा उपआयुक्त यांच्या संयुक्त नावाने ३ वर्षांसाठी विमा उतरविणे आवश्यक आहे. तसेच भारत पशुधन पोर्टलवर (NDLM) नोंदणी करणे बंधनकारक आहे.
- अतिरिक्त खर्च: निर्धारित किमतीपेक्षा जास्त किंमत झाल्यास फरकाची रक्कम व संपूर्ण वाहतूक खर्च लाभार्थ्याला स्वतः करावा लागेल.
- दुसरा हप्ता वितरण: खरेदी पावती, जिओ-टॅग फोटो, भारत पशुधन ओळख क्रमांक व विमा पोर्टलवर अपलोड केल्यानंतर तालुका (१५ दिवस), जिल्हा (१० दिवस) आणि आयुक्त (१० दिवस) स्तरावरील तपासणीनंतर दुसरा हप्ता खात्यात जमा होईल.
🛒 शेळ्या-मेंढ्या खरेदी समितीची संरचना
| अ.क्र. | समिती सदस्य | पद |
|---|---|---|
| १ | संबंधित तालुक्याचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी | अध्यक्ष |
| २ | कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्याचे संस्थाप्रमुख | सदस्य |
| ३ | बँक प्रतिनिधी (कर्ज प्रकरणी) | सदस्य |
| ४ | विमा कंपनीचे प्रतिनिधी | सदस्य |
| ५ | लाभार्थी स्वतः | सदस्य |
⚠️ ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना महत्त्वाच्या अटी, शर्ती,कायदेशीर कारवाई
- लाभार्थ्याने अनुदानावर मिळालेल्या शेळ्या-मेंढ्या किमान ३ वर्षे योग्य रीतीने सांभाळणे बंधनकारक आहे.
- पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय शेळ्या-मेंढ्यांची विक्री करता येणार नाही.
- नियमित लसीकरण व उपचार करून घेणे आणि अधिकाऱ्यांना दरमहा प्रत्यक्ष पडताळणीसाठी गट दाखविणे आवश्यक आहे.
- विम्याचा बिल्ला कानातून पडल्यास तात्काळ बँक, विमा कंपनी व तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना कळविणे बंधनकारक आहे.
- शेळी किंवा मेंढी मृत पावल्यास तात्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याला कळवून शवविच्छेदन करून घ्यावे व विम्याच्या रकमेतून दुसरी नवीन शेळी/मेंढी खरेदी करणे बंधनकारक आहे.
- कठोर कारवाई: अनुदानाचा गैरविनियोग केल्यास किंवा शेळ्या-मेंढ्यांची परस्पर विक्री केल्यास संपूर्ण अनुदान व्याजासह महसुली पद्धतीने वसूल केले जाईल, संबंधित कुटुंबाला पुढील ५ वर्षे कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच इंडियन पिनल कोड कलम ४१५ ते ४६४ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| तपशील | लिंक |
|---|---|
| ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ऑनलाइन अर्ज (महाडीबीटी २.० पोर्टल) | अर्ज करा |
| पशुसंवर्धन विभाग अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| मार्गदर्शक सूचना उपलब्ध झाल्यास अपडेट मिळेल | PDF डाउनलोड करा |
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
५०+५ शेळी-मेंढी पालन योजनेसाठी किती अनुदान मिळते?
या योजनेत एकूण ₹११,३८,५५४/- प्रकल्प किमतीवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५०% (₹५,६९,२७७/-) आणि अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गासाठी ७५% (₹८,५३,९१५/-) अनुदान मिळते.
स्वतःची जमीन नसेल तर या योजनेसाठी अर्ज करता येतो का?
होय, स्वतःच्या नावे १ एकर जमीन नसल्यास ५ वर्षे कालावधीसाठी नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा सादर करून अर्ज करता येतो.
अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर काय करावे?
अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे २ वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र सादर करता येते.
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा?
या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी २.० (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
