१ मे पासून डिजिटल जनगणना २०२७: घरबसल्या माहिती कशी भरावी? सविस्तर मार्गदर्शक
महाराष्ट्र जनगणना २०२७ (Digital Census Update): भारताच्या इतिहासातील १६वी आणि स्वातंत्र्यानंतरची ८वी जनगणना आता एका नव्या स्वरूपात आपल्यासमोर येत आहे. विशेष म्हणजे, ही भारताची पहिली संपूर्णपणे डिजिटल जनगणना असणार आहे. कोरोना संकटामुळे २०२१ मध्ये होणारी प्रक्रिया लांबणीवर पडली होती, जी आता १ मे २०२७ पासून अधिकृतपणे सुरू होत आहे.
महाराष्ट्र जनगणना २०२७ अंतर्गत 'Self Enumeration' (स्व-गणना) नोंदणी तुम्हाला ऑनलाइन करायची आहे. महाराष्ट्र राज्यात स्व-गणना करण्याची अधिकृत मुदत ०१.०५.२०२६ ते १५.०५.२०२६ या कालावधीत निश्चित करण्यात आली आहे.
या ठराविक कालावधीतच नागरीकांसाठी अधिकृत वेब पोर्टल खुले केले जाईल. घरबसल्या ऑनलाइन माहिती भरल्यामुळे, जेव्हा प्रगणक तुमच्या घरी येतील तेव्हा तुमचा मौल्यवान वेळ वाचेल. त्यामुळे १ मे पासून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलला नक्की भेट द्या.
- जनगणनेचा इतिहास आणि २०२७ चे विशेष महत्त्व
- डिजिटल जनगणना म्हणजे काय? (ॲप आणि पोर्टलची माहिती)
- घरबसल्या माहिती भरण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
- प्रगणक विचारणार असलेले ३३ प्रमुख प्रश्न (यादी)
- गोपनीयता आणि सुरक्षा: तुमची माहिती किती सुरक्षित?
- काय करावे आणि काय करू नये (Do's & Don'ts)
- सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
१. जनगणनेचा इतिहास आणि २०२७ चे विशेष महत्त्व
भारतातील जनगणनेचा इतिहास खूप जुना आहे. १८७२ मध्ये पहिली विखुरलेली जनगणना झाली, तर १८८१ पासून दर १० वर्षांनी नियमित जनगणना होऊ लागली. २०२७ ची जनगणना यासाठी खास आहे कारण प्रथमच कागदाचा वापर बंद होऊन संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली जाणार आहे.
जनगणना केवळ लोकांची संख्या मोजण्यासाठी नसते, तर त्या माहितीच्या आधारे सरकार पुढील १० वर्षांसाठी शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांचे नियोजन करते. जर तुमची माहिती चुकीची नोंदवली गेली, तर त्याचा परिणाम सरकारी योजनांच्या लाभावर होऊ शकतो.
२. डिजिटल जनगणना म्हणजे काय? (ॲप आणि पोर्टलची माहिती)
यावेळी प्रगणक (Enumerator) तुमच्या घरी येताना जाडजूड फाईल्स किंवा कागदी फॉर्म आणणार नाहीत. केंद्र सरकारने विकसित केलेले एक विशेष मोबाईल ॲप त्यांच्याकडे असेल. तुम्ही दिलेली माहिती ते थेट ॲपमध्ये भरतील. या डिजिटल पद्धतीचे मुख्य फायदे खालीलप्रमाणे आहेत:
- वेगवान प्रक्रिया: माहिती गोळा करणे आणि ती संकलित करणे खूप सोपे होईल.
- अचूकता: कागदावर लिहिताना होणाऱ्या मानवी चुका डिजिटल स्वरूपात टळतील.
- सुरक्षित डेटा: तुमची माहिती थेट सुरक्षित सर्व्हरवर अपलोड होईल, ज्यामुळे ती गहाळ होण्याची भीती नाही.
३. घरबसल्या माहिती भरण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत
नागरिकांना स्वतःहून माहिती भरण्याची सोय (Self Enumeration) प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा:
- लॉगिन: अधिकृत 'Census 2027' पोर्टलवर जा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.
- ओटीपी व्हेरिफिकेशन: तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो प्रविष्ट करून नोंदणी पूर्ण करा.
- कुटुंब माहिती: तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे, वय, लिंग, वैवाहिक स्थिती आणि नातेसंबंधांची माहिती भरा.
- मालमत्ता आणि सुविधा: तुमच्या घरात असलेल्या सुविधा (उदा. टीव्ही, फ्रीज, इंटरनेट, वाहन) याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
- सबमिशन: माहिती पूर्ण भरल्यानंतर 'Submit' बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक Reference ID (संदर्भ क्रमांक) मिळेल. हा आयडी स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा लिहून ठेवा.
४. प्रगणक विचारणार असलेले ३३ प्रमुख प्रश्न
जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात, ज्याला 'घरगणना' (House Listing) म्हणतात, प्रगणक तुम्हाला एकूण ३३ प्रश्न विचारतील. त्यापैकी महत्त्वाचे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत:
२. सुविधा: घरात पिण्याचे पाणी, शौचालय आणि वीज जोडणी आहे का?
३. इंधन: स्वयंपाकासाठी गॅस (LPG), सरपण की इतर इंधन वापरता?
४. मालमत्ता: तुमच्याकडे सायकल, दुचाकी, चारचाकी वाहन, रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाईल आहे का?
५. मुख्य व्यक्ती: कुटुंबाचा मुख्य निर्णय घेणारी व्यक्ती कोण आहे?
५. गोपनीयता आणि सुरक्षा: तुमची माहिती किती सुरक्षित?
अनेकांच्या मनात भीती असते की आमची माहिती खाजगी कंपन्यांना किंवा बँकांना दिली जाईल का? याचे उत्तर स्पष्टपणे "नाही" असे आहे. जनगणना कायदा १९४८ (Census Act 1948) नुसार, तुम्ही दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. ही माहिती कोणत्याही न्यायालयात पुराव्यासाठी वापरली जाऊ शकत नाही आणि ती कोणाही त्रयस्थ व्यक्तीला दिली जात नाही.
६. काय करावे आणि काय करू नये (Do's & Don'ts)
- प्रगणकाला पूर्णपणे सहकार्य करा आणि सत्य माहिती द्या.
- जन्म तारीख, आधार क्रमांक (ऐच्छिक) आणि शैक्षणिक पात्रता अचूक सांगा.
- प्रगणक आल्यावर त्यांचे अधिकृत शासकीय ओळखपत्र (ID Card) नक्की तपासा.
- जर तुम्ही ऑनलाइन माहिती भरली असेल, तर प्रगणकाला फक्त तुमचा 'Reference Number' द्या.
- जनगणनेच्या नावाखाली कोणी तुमचा Bank OTP किंवा ATM PIN विचारल्यास देऊ नका.
- कोणत्याही अनोळखी किंवा संशयास्पद वेबसाईटवर आपली माहिती भरू नका.
- जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊ नका, कारण तो कायद्याने गुन्हा आहे.
- प्रगणकाशी वाद घालू नका; ते केवळ सरकारी ड्युटी करत आहेत.
