Ration Card Documents List
रेशनकार्ड सेवा आणि आवश्यक कागदपत्रे - संपूर्ण माहिती
विषय सूची (Table of Contents)
2. अन्न सुरक्षा योजना पात्रता
3. अंत्योदय अन्न योजना लाभार्थी
4. काय करावे व काय करू नये
5. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- विहीत नमुन्यातील अर्ज ५/- रु. तिकीटासह
- इतर तालुक्यातून शिधापत्रिका रद्द करून आणली असल्यास सदर शिधापत्रिकेतून नावे कमी केलेला मूळ दाखला
- तहसिलदार यांचा चालू वार्षिक उत्पन्न दाखला
- निवासी संबंधीचा पुरावा - (विजेचे देयक (लाईट बील) / निवास स्थानाचा मालकीबद्दल पुरावा (घराचा उतारा) / भाडेकरारपत्र / टेलिफोन बिल यापैकी एक)
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स
- कुटुंब प्रमुखाची बँक पासबुक झेरॉक्स
- गॅस जोडणी पुस्तकाची झेरॉक्स / नसल्यास गॅस जोडणी नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो
- विहीत नमुन्यातील अर्ज ५/- रु. तिकीटासह
- ज्या शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट आहे त्या शिधापत्रिकेची झेरॉक्स
- तहसिलदार यांचा चालू वार्षिक उत्पन्न दाखला
- निवासी संबंधीचा पुरावा - (विजेचे देयक / घराचा उतारा / भाडेकरारपत्र / टेलिफोन बिल यापैकी एक)
- विभक्त राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
- पत्नी व मुलांची नावे असल्यास आवश्यक दाखले (विवाह नोंदणी / नाव कमी केलेला दाखला / जन्माचा दाखला)
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड व कुटुंब प्रमुखाची बँक पासबुक झेरॉक्स
- गॅस जोडणी पुस्तकाची झेरॉक्स / स्वयंघोषणापत्र
- सर्वांचे पासपोर्ट साईज फोटो
- विहीत नमुन्यातील अर्ज ५/- रु. तिकीटासह
- वार्षिक उत्पन्न दाखला
- खराब / जीर्ण मूळ शिधापत्रिका
- शिधापत्रिकेत नमूद सर्वांची आधार कार्ड झेरॉक्स
- हरविली असल्यास किंवा चोरीला गेली असल्यास पोलीस ठाणे येथील दाखला व हरविलेबाबत प्रतिज्ञापत्र
- विवाहीत महिलेचे नाव वाढवायचे असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र व नाव कमी केलेला मूळ दाखला.
- लहान मुलांचे नाव वाढवायचे असल्यास जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स.
- नाव कमी करायचे असल्यास (मयत असल्यास मृत्यू प्रमाणपत्र / लग्न झाले असल्यास विवाह प्रमाणपत्र).
- आधार कार्डची झेरॉक्स.
प्राधान्य कुटुंब (PHH) लाभार्थ्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा
४४,०००/-
५९,०००/-
आवश्यक कागदपत्रे:
- अर्ज ५/- रु. तिकीटासह
- तहसिलदार यांचा चालू वार्षिक उत्पन्न दाखला
- कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स व शिधापत्रिका झेरॉक्स
- शासन निर्णय क्रमांक आसुका-२०२१/प्र.क्र.६५/ना.पु.२२/ दिनांक १५ सप्टेंबर २०२१ अन्वये करावयाचे हमीपत्र.
- ज्या कुटुंबांचे प्रमुख विधवा स्त्रिया अथवा आजारी वा अपंग किंवा ६० वर्षे वयावरील वृध्द आहेत व ज्यांना उदरनिर्वाहाचे निश्चित साधन नाही.
- एकटे राहत असलेले दुर्धर आजारग्रस्त / अपंग / विधवा / ६० वर्षांवरील वृध्द.
- आदिम आदिवासी कुटुंबे (माडीया, कोलाम, कातकरी).
- भूमीहीन शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, ग्रामीण कारागीर (कुंभार, चांभार, मोची, विणकर इ.).
- झोपडपट्टी रहिवासी, हमाल, रिक्षाचालक, कचरा वेचणारे, फळे व फुले विक्रेते.
- कुष्ठरोगी / बरा झालेला कुष्ठरोगी कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे.
- सर्व कागदपत्रे स्पष्ट व साक्षांकित (Attested) असावीत.
- मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक ठेवावा.
- अर्जावर ५ रुपयांचे तिकीट लावल्याची खात्री करा.
- उत्पन्नाची खोटी माहिती अर्जात देऊ नका.
- शिधापत्रिकेत खाडाखोड करू नका.
- मुदतबाह्य झालेला उत्पन्न दाखला जोडू नका.
१. नवीन रेशन कार्ड मिळण्यास किती वेळ लागतो?
साधारणपणे १५ ते २१ दिवसात प्रक्रिया पूर्ण होते.
२. ५ रुपयांचे तिकीट कोठे मिळते?
हे तिकीट कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा मुद्रांक विक्रेत्याकडे मिळते.
३. ऑनलाईन आधार लिंक कसे करावे?
mahafood.gov.in या पोर्टलवर जाऊन तुम्ही आधार सीडिंग करू शकता.
४. उत्पन्न दाखला किती वर्षांसाठी ग्राह्य धरला जातो?
तहसिलदार यांचा दाखला साधारणपणे १ वर्षासाठी ग्राह्य असतो.
५. रेशन कार्ड हरवले तर काय करावे?
RCMS साइटवर नोंद करून Digital Copy डाउनलोड करावी.
६. लग्नानंतर नाव कमी करण्यासाठी काय करावे?
विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि सासरच्या रेशन कार्डाची प्रत जोडावी. किवा RCMS साइटवरून नाव कमी करावे.
७. गॅस जोडणी तपशील देणे गरजेचे आहे का?
हो, गॅस जोडणी असल्यास पुस्तिकेची प्रत आणि नसल्यास स्वयंघोषणापत्र आवश्यक आहे.
८. ग्रामीण भागाची उत्पन्न मर्यादा किती आहे?
अन्न सुरक्षा योजनेसाठी ४४,०००/- रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे.
९. रेशन कार्डसाठी कोठे संपर्क साधावा?
तुमच्या संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
१०. अंत्योदय योजनेचे धान्य किती मिळते?
शासकीय नियमानुसार प्रति कार्ड ३५ किलो धान्य सवलतीच्या दरात दिले जाते.
