मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2026: पात्रता, लाभ आणि अर्ज प्रक्रिया Mukhyamantri Tirth Darshan Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रेचे स्वप्न होणार पूर्ण

महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सामाजिकदृष्ट्या महत्वाची योजना आहे. या योजनेद्वारे 60 वर्षे व त्यावरील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना भारत व महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी दिली जाते.


मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना म्हणजे काय?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणारी योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ  नागरिकांना प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतके अनुदान प्रवास, भोजन व निवासासाठी दिले जाते. 

 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा उद्देश

  1. ज्येष्ठ नागरिकांच्या धार्मिक व आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणे.
  2. आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करणे.
  3. सर्वधर्मीय नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देणे.
  4. ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक समाधान वाढवणे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे प्रमुख लाभ

  1. प्रत्येक व्यक्तीला ₹30,000 पर्यंत अनुदान.
  2. प्रवास, भोजन व निवासाचा समावेश.
  3. शासनमान्य व सुरक्षित प्रवास.
  4. 75 वर्षांवरील नागरिकांसाठी पत्नी किंवा सहाय्यक नेण्याची सुविधा.
  5. अर्ज प्रक्रिया पुर्णपणे मोफत आहे.
हे देखील वाचा »  5 लाखांपर्यंत दवाखाना फ्री -प्रधानमंत्री आयुष्मान भारत जन आरोग्य योजना

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पात्रता 

  1. अर्जदाराचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  2. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  3. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रता

  1. ❌ कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता असल्यास
  2. ❌ कुटुंबातील सदस्य सरकारी/निमसरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असल्यास
  3. ❌ कुटुंबातील सदस्य खासदार, आमदार (विद्यमान किंवा माजी) असल्यास
  4. ❌ भारत/राज्य सरकारच्या बोर्ड, महामंडळ, उपक्रमांचे अध्यक्ष, संचालक सदस्य
  5. ❌ कुटुंबाच्या नावावर चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) असल्यास
  6. ❌ टीबी, गंभीर हृदयरोग, मानसिक आजार, संसर्गजन्य रोग असल्यास
  7. ❌ मागील वर्षी निवड होऊनही प्रवास न केलेले अर्जदार

हे देखील वाचा »  महा-डीबीटी योजनेसाठी शेतकर्‍यांना लागणारी आवश्यक कागदपत्रे
 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत

  1. ✔️ आधार कार्ड
  2. ✔️ रेशन कार्ड
  3. ✔️ महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र / पर्यायी पुरावे
  4. ✔️ उत्पन्नाचा दाखला (₹2.50 लाखांपर्यंत)
  5. ✔️ वैद्यकीय प्रमाणपत्र (15 दिवसांपेक्षा जुने नसावे)
  6. ✔️ पासपोर्ट साइज फोटो
  7. ✔️ जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर
  8. ✔️ हमीपत्र (अटी व शर्ती मान्य केल्याचे)

 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज करण्याची प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत करता येतो. अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना लाभार्थी निवड प्रक्रिया

जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जातो. अर्ज जास्त असल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड यादी पोर्टल व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाते. 

हे देखील वाचा »  समाज कल्याण हॉस्टेल योजना महाराष्ट्र, सर्व काही मोफत
 

75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष नियम

  1. एक सहाय्यक किंवा जीवनसाथी सोबत नेण्याची परवानगी
  2. सहाय्यकाचे वय 21 ते 50 वर्षे असावे
  3. सहाय्यक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असावा

प्रवासाची संपूर्ण माहिती

  1. प्रवास फक्त गटामध्ये केला जाईल.
  2. रेल्वे / बसद्वारे प्रवास.
  3. टूर एजन्सी शासनमान्य असेल.
  4. प्रवासस्थळी स्वतःच्या खर्चाने पोहोचणे आवश्यक.
  5. प्रवास अर्धवट सोडल्यास खर्चाची भरपाई नाही .

 

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

प्रश्न 1: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्रातील 60 वर्षांवरील सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांसाठी.

प्रश्न 2: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मध्ये किती अनुदान मिळते?

प्रति व्यक्ती कमाल ₹30,000.

प्रश्न 3: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज करण्यासाठी शुल्क आहे का?

नाही, अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.

प्रश्न 4: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाचा एकापेक्षा जास्त वेळा लाभ घेता येतो का?

नाही, फक्त एकदाच लाभ घेता येतो.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही ज्येष्ठ नागरिकांच्या श्रद्धेला दिलेला मान आहे. पात्र नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी.


#मुख्यमंत्री_तीर्थ_दर्शन_योजना #SeniorCitizenScheme #MaharashtraYojana #ज्येष्ठनागरिक #तीर्थयात्राMukhyamantri Tirth Darshan Yojana, Senior Citizen Tirth Yatra Yojana, Jyestha Nagrik Yojana, Moft Tirthyatra Yojana, Sarkari Yojana Maharashtra, Tirth

थोडे नवीन जरा जुने