JEE/NEET/MHT-CET - Batch - 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना: Mahajyoti Free Tablet Yojana
mahajyoti free tablet yojana महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 - 2028 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने-महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीकडून अर्ज करण्यास आवाहन केले आहे. mahajyoti free tablet yojana तसेच ऑनलाईन JEE/NEET/MHT-CET प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येईल.
| योजनेचे नाव | JEE/NEET/MHT-CET - Batch -2026 Training free tablet |
| योजना क्षेत्र | महाराष्ट्र राज्य (Mahajyoti) |
| लाभार्थी | 11 वी विज्ञान शाखेला प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
| अर्ज कालावधी | 30 / 05 / 2026 पर्यंत |
| मंडळ | महाज्योती |
| योजनेचा लाभ | JEE/NEET/MHT-CET Training + Free Tablet |
योजनेच्या लाभासाठी पात्रता :-
- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- विद्यार्थी OBC, (VJ-A), (NT-B), (NT-C), (NT-D) किंवा SBC प्रवर्गातील असावा तसेच नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
- वर्ष 2026 मध्ये 10 वी SSC ची परीक्षा पास झालेले विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी पात्र राहतील.
- विद्यार्थी याने विज्ञान (Science) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.
- निवड ही 10 वी च्या प्राप्त टक्केवारी, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
- इयत्ता 10 वी मध्ये शहरी भागासाठी 70% आणि ग्रामीण भागासाठी 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- शहरी किंवा ग्रामीण पत्ता विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड वरील पत्त्यावरून निश्चित केला जाईल.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजू)
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (NCL)
5. 10 वी ची गुणपत्रिका
6. दिव्यांग असल्यास दाखला
7. अनाथ असल्यास दाखला
2. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
3. जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate)
4. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (NCL)
5. 10 वी ची गुणपत्रिका
6. दिव्यांग असल्यास दाखला
7. अनाथ असल्यास दाखला
सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण
| अ.क्र | सामाजिक प्रवर्ग | समांतर आरक्षण |
|---|---|---|
| 1 | इतर मागास वर्ग (OBC) | 59% |
| 2 | विमुक्त जाती - अ (VJ-A) | 10% |
| 3 | भटक्या जमाती ब (NT-B) | 8% |
| 4 | भटक्या जमाती - क (NT-C) | 11% |
| 5 | भटक्या जमाती ड (NT-D) | 6% |
| 6 | विशेष मागास प्रवर्ग (SBC) | 6% |
समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे :-
- प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे.
- दिव्यांगाकरीता 4% जागा आरक्षित आहे.
- अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे.
Note: शहरी तसेच ग्रामीण भागाकरीता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल.
अर्ज कसा करावा :-
- विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन Notice Board मधील "Application for JEE/NEET/MHT-CET Batch -2026 Training" वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षांकीत करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 30/05/2026 आहे.
- पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- निवड प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार महाज्योती व्यवस्थापकीय संचालकांकडे राहतील.
- सादर केलेली माहिती चुकीची आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर प्रवेश रद्द केला जाईल.
- अडचणी आल्यास संपर्क: 0712-2870120/21 | ई-मेल: mahajyotimpsc21@gmail.com
महत्वाच्या लिंक्स (Important Links)
Tags:
शैक्षणिक करिअर