Police Verification Certificate Online Maharashtra: पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज कसा करावा?
कोणत्याही नोकरीसाठी तसेच CSC केंद्र चालक, Cyber Cafe चालकांसाठी police Verification Certificate online म्हणजेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. ज्या व्यक्तीला किंवा उमेदवारांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवे असेल किंवा काढायचे असल्यास त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यानंतर मग तो अर्ज संबंधित पोलीस स्टेशनला ऑनलाईन पध्दतीने सादर केला जातो. तर काही ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आणि त्याला कागदपत्रे जोडून जमा करावा लागतो. त्यानंतर जिल्हा स्तरावर उमेदवाराची चारित्र्य पडताळणी पोलिस यंत्रणेमार्फत केली जाते. त्यामध्ये उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत का? किंवा उमेदवारावर न्यायालयात काही खटले सुरू आहेत का? याची पोलिसांमार्फत पडताळणी केली जाते.
पोलीस स्टेशन मध्ये तो अर्ज संबंधित पोलीस आयुक्तालय कार्यालय / पोलीस अधीक्षक कार्यालयात पडताळणीसाठी दाखल करण्यात येतो. पोलिस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ' चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ( Police Verification Certificate) अर्जदारास मिळते. डेस्कटॉप किंवा मोबाईलवर चारित्र्य पडताळणीसाठी (police Verification) ऑनलाईन अर्ज कसा करावा? याबद्दल माहिती या लेखात दिली आहे. मित्रांनो, हा लेख पूर्ण वाचा यामध्ये तुम्ही घरीबसल्या जागी कसा पोलीस चारित्र्य पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता याबाबतची माहिती स्टेप बाय स्टेप सांगितली आहे. तुम्हाला हा लेख आवडल्यास इतरांना शेअर करा व मित्रांना शेअर करा.
2. लॉगीन | Login
3. अर्ज भरा | Fill Application
4. शुल्क भरणा | Pay Fees
5. स्थानिक पोलीस स्टेशन स्तरावरील पडताळणी | Local Verification
6. पोलीस आयुक्तालय / अधीक्षक कार्यालय पडताळणी | Office Verification
महाऑनलाईन अधिकृत संकेतस्थळ वर गेल्यानंतर Registration वर क्लिक करा. आपल्यासमोर आपली वैयक्तिक माहिती विचारणारे एक पेज उघडलेले दिसेल. त्यात विचारलेल्या माहितीनुसार आपला आधार नंबर टाकावा. आणि नाव आणि दिलेली सर्व वैयक्तिक माहिती इंग्रजीमध्ये टाकायची आहे त्यानंतर आपोआप मराठीमध्ये लिहिलेले दिसेल.
त्यामध्ये काही चुका असल्यास आपण त्या दुरुस्तही करू शकतो. त्यानंतर आपले पोलीस अधीक्षक कार्यालय / पोलीस आयुक्तालय निवडायचे. Email ID च्या समोरील रकान्यात आपला Email ID अचूकपणे नोंदवायचा आहे. आपले Username म्हणून आपल्याला आपला मोबाईल क्रमांक नोंदवायचा आहे. त्यानंतर आपल्या या महाऑनलाईन खात्यासाठी एक पासवर्ड नोंदवायचा आहे. शेवटी विचारलेल्या सोप्या प्रश्नाचे उत्तर देऊन Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.
- माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरा.
- स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स स्पष्ट असावेत.
- चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्या.
- दोन जामीनदारांची माहिती सोबत ठेवा.
- गुन्हेगारी माहिती लपवू नका.
- अस्पष्ट फोटो किंवा सही अपलोड करू नका.
- अपूर्ण अर्ज सबमिट करू नका.
- चुकीचे पोलीस स्टेशन निवडू नका.
त्यानंतर आपण नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एक Verification Code येईल. तो कोड Enter Verification Code समोरील रकान्यात टाकायचा व पुढील Verify या बटनावर क्लिक करा. शेवटी आपल्यासमोर ' Your registration completed successfully ' असा संदेश येईल. म्हणजे आपले Registration यशस्वीपणे पूर्ण झाले आहे.
आता आपल्यासमोर आलेल्या Log in विंडो मध्ये Username च्या जागी आपला मोबाईल क्रमांक व Password च्या जागी आपण नोंदविलेला पासवर्ड टाकून पुढे आलेला Captcha Code समोरील रकान्यात टाकून Login बटनावर क्लिक करा.
लॉगीन झाल्यानंतर आपल्यासमोरील डाव्या बाजूला असलेल्या SERVICES वर क्लिक करा व त्यातील CHARACTER CERTIFICATE वर क्लिक करा. आपल्यासमोर आलेल्या Instructions काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. पत्त्याचा पुरावा आणि अनिवार्य कागदपत्रे वाचून Next Page वर क्लिक करा. Address Information मध्ये पूर्ण नाव इंग्रजी व मराठीमध्ये लिहा. Present Residential Address अचूकपणे टाकावा. जेथे प्रमाणपत्र सादर करायचे आहे त्या कंपनीचा पत्ता नोंदवा. मागील १० वर्षांतील रहिवासी माहिती भरा.
महाराष्ट्र पोलीस पडताळणी ऑनलाईन लिंक
Apply Online Registration (क्लिक करा)Proceed to Payment वर क्लिक केल्यानंतर फी भरण्याचा पर्याय निवडा. फी भरल्यानंतर पावती प्रिंट काढून घ्यावी आणि फॉर्मची देखील प्रिंट घ्यावी. अशाप्रकारे आपला अर्ज आपण घरबसल्या भरला आहे. फॉर्मची प्रिंट, फी पावती आणि कागदपत्रे जोडून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचा आहे.
पोलीस पडताळणी प्रमाणपत्र: १० महत्वाचे प्रश्न (FAQ)
नोकरी, पासपोर्ट आणि संवेदनशील सेवांसाठी तुमचे चारित्र्य प्रमाणित करण्यासाठी हे आवश्यक आहे.
साधारणपणे १५ ते २१ कामकाजाच्या दिवसात प्रक्रिया पूर्ण होते.
शासनाने ठरवलेली नाममात्र फी तुम्हाला पोर्टलवर ऑनलाईन भरावी लागते.
प्रमाणपत्र जारी झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत ते वैध असते.
नाही, तुम्ही सध्या जिथे राहता त्या स्थानिक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पडताळणी करू शकता.
रिजेक्शनचे कारण तपासून पुन्हा दुरुस्तीसह अर्ज करावा लागतो.
तुम्हााला ओळखणारे कोणतेही दोन प्रतिष्ठीत नागरिक ज्यांचे गुन्हेगारी रेकॉर्ड नाही.
हो, तुम्ही मोबाईल ब्राउझरमध्ये डेस्कटॉप साईट निवडून अर्ज भरू शकता.
हो, बहुतांश ठिकाणी कागदपत्रे तपासणीसाठी प्रत्यक्ष बोलावले जाते.
पडताळणी पूर्ण झाल्यावर तुम्ही पोर्टलवरून लॉगीन करून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
टिप- काही जिल्ह्यांमध्ये सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे, त्यामुळे फिजिकल फॉर्म जमा करण्याची गरज नसते. पडताळणी पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा पर्याय तुमच्या लॉगीनमध्ये उपलब्ध होतो.