पोलीस भरती कागदपत्रे 2025: List of Documents for Maharashtra Police Bharti Exam
राज्यातील पोलीस भरती (Maharashtra Police Bharti) कधी होणार? याकडे लक्ष असलेल्या तरुण मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात रखडलेली पोलीस भरती अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य पोलीस दलातील जवळपास 15000+ पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. खालील लेखात आपण police bharti documents in marathi बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
मैदानी चाचणीसाठीचे Admit Card अधिकृत संकेतस्थळ www.mahapolice.gov.in वर जाहीर करण्यात येतील.
| तपशील (Details) | माहिती (Information) |
|---|---|
| जाहिरात | महाराष्ट्र पोलीस भरती 2025 |
| अर्ज प्रक्रिया | 29/10/2025 ते 30/11/2025 |
| एकूण पदे | 15000+ पदे |
| पदाचे नाव | कॉन्स्टेबल, रेल्वे पोलीस, पोलीस शिपाई |
| शैक्षणिक पात्रता | 12 वी पास / पदवीधर |
पोलीस भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Police Bharti Documents List)
- आधारकार्ड (Aadhar Card)
- रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate)
- 10 वी आणि 12 वी मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
- पदवी प्रमाणपत्र (Graduation) - असल्यास
- MSCIT किंवा CCC प्रमाणपत्र
- डोमोसाईल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जातीचा दाखला (Caste Certificate) - OBC/SC/ST साठी
- Non-Creamy Layer प्रमाणपत्र
- चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
- नुकतेच काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो व स्वाक्षरी
निवड प्रक्रिया: आधी शारीरिक चाचणी (Physical Test)
नवीन नियमांनुसार, आता प्रथमतः शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. मैदानी चाचणी एकूण 50 गुणांची असेल.
पुरुष (Male Physical)
| 1600 मी धावणे | 20 मार्क |
| 100 मी धावणे | 15 मार्क |
| गोलाफेक | 15 मार्क |
| एकूण गुण | 50 मार्क |
महिला (Female Physical)
| 800 मी धावणे | 20 मार्क |
| 100 मी धावणे | 15 मार्क |
| गोलाफेक | 15 मार्क |
| एकूण गुण | 50 मार्क |